स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
– The गडविश्व
गडचिरोली, २८ जुलै : येथील लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे उद्या शुक्रवार २९ जुलै २०२२ ला पीएसआय अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ व स्पर्धा परीक्षा विषयी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत अतीदुर्गम, नक्षलग्रस्त अशा गडचिरोली जिल्ह्यातील नितीन देऊळकर व सचिन वासेकर यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्काराचा कार्यक्रम लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, गोंडवाना विद्यापीठाजवळ, कोटगल रोड, गडचिरोली येथे उद्या २९ जुलै ला आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता मोफत स्पर्धा परीक्षा विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत स्पर्धा स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना विद्यार्थ्यांनी नियोजन कसे करावे ? तसेच स्पर्धा परीक्षा विषयी चा अभ्यासक्रम कसा असतो ? स्पर्धा परीक्षेची तयारी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे व स्पर्धा परीक्षा मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे अकॅडमीचे संचालक तथा मार्गदर्शक प्रा. राजीव खोबरे सर, प्रा. नंदनवार सर यांनी कळविले आहे.

#psi #psiexam #gadchirolinews #gondwana