– प्रत्येक विद्याशाखेचे विद्या परिषदेवर प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्याशाखानिहाय आरक्षण सोडत
The गडविश्व
गडचिरोली, १९ जुलै : विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार प्रत्येक विद्याशाखेचे विद्या परिषदेवर प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्याशाखानिहाय आरक्षण सोडत होणार असून यासाठी उद्या २० जुलै ला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठातील प्रत्येक विद्याशाखा ही जातीसंवर्ग आरक्षीत करावयाचे असून एकूण ८ जागांपैकी एका विद्याशाखेची एक जागा महिलेसाठी आरक्षित करायची असून ही आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे निश्चित केली जाणार आहे.
त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली गोंडवाना (Gondwana University) विद्यापीठाच्या सभागृहात उद्या २० जुलै ला सकाळी ११.३० वा. वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी केले आहे.