The गडविश्व
कोरची : येथील पारबताबाई विद्यालय येथे ब्लड डोनर ग्रुप कोरची च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन उद्या १३ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. बातमी प्राप्त होईपर्यंत २७ रक्तदात्यांनी रक्तदान कारण्यासाठी आपले नाव नोंदवले आहेत. ज्यांना या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हायचे आहेत व ज्यांनी आपले नाव नोंदविले नसेल ते सुद्धा १३ जानेवारीला पारबताबाई विद्यालय येथे रक्तदान करू शकतात असे आवाहन ब्लड डोनर ग्रुपच्या सदस्यांनी केले असून सदर शिबिराचे वेळ हे सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत निर्धारित करण्यात आले आहे.
