– राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने आयोजन
The गडविश्व
यवतमाळ, ९ जुलै : राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने उद्या १० जुलै रोजी यवतमाळ येथे पहिले विदर्भस्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ आज संपुर्ण महाराष्ट्रासह संपुर्ण भारतभर अनेक राज्यात पत्रकारांच्या हक्काबाबत पाठपुरावा करीत आहे. पत्रकाराने केवळ वृत्तांकन न करता सामाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी लढणारा पत्रकारांचा एक बहुउद्देशिय संघ आहे. विदर्भातील पत्रकारांचा एकमेकांशी संवाद व्हावा या करिता यवतमाळ येथे पहिले विदर्भस्तरीय पत्रकार संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाला उद्घाटक म्हणून नागपूरचे जेष्ठ पत्रकार तथा शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे, अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा विदर्भ नेतेे वामनराव चटप, प्रसिध्द कवी व जेष्ट साहित्यीक हेमंतकुमार कांबळे, विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव आर. आर. देसाई, प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील तर विशेश अतिथी म्हणून मराठी सिने दिग्दर्शक विकास कांबळे, यवतमाळचे तहसिलदार कुणाल झाल्टे, यवतमाळ जिल्हा पत्रकार संघ जिल्हा महासचिव अरूण जोग उपस्थित राहणार आहेत. तसेस यावेळी यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भुमरे, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर, आमदार संजय राठोड, आमदार मदन येरावार, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार इंद्रनिल नाईक, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार ख्याजा बेग, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रविण देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, प्रदिप झाडे, धनंजय तांबेकर, अमोल बोदडे, अनिरूध्द पंाडे, विद्या खडसे आदी उपस्थित राहणार आहे.
या संमेलनात दोन पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार व एक सामाजिक व दोन सहकार क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार यासह एकुण 50 पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.