ई पीक पाहणी ऑफलाईन करा : जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार

126

The गडविश्व
गडचिरोली, २१ ऑक्टोबर : खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये शेतातील ई-पीक पेरा नोंदणीसाठी विविध माध्यमातून शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा स्वतःनोंदविणे शासनाने ग्राह्य धरल्या गेले होते. मात्र, शासनाचा ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अहेरी तालुक्यातील अनेक भागात नेटवर्कची समस्या आहे. काही शेतकऱ्यांकडे मोबाईल नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे यानंतरही काही ठिकाणी क्षेत्र कमी अधिक असल्याचे दिसून आले या सर्व प्रकारामुळे ई-पीक पेरा नोंदणी करतानाच शेतकरी मेटाकुटीस आल्याचे दिसून आले आहे यानंतर धान्य खरेदी केंद्रावर धानविक्रीची ऑनलाईन प्रक्रिया ही २१ ऑक्टोबर पर्यंत असल्याने शेतकरी वर्ग विवंचनेत सापडला आहे चालू हंगामाचा खसरा सातबारा मध्ये नोंदच नसल्याने आपण यावर्षी धान विकणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकीकडे अहेरी तालुक्यातील अतिदुर्ग व आदीवासी बहूल गावे असल्याने सातबारा ऑनलाइन काढण्यासाठी संबंधित तलाठी वर्ग मुख्यालय ही राहत नाही यामुळे शेतकऱ्यांना सातबारा आठ ‘अ’ साठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात तलाठ्याकडे गेल्यानंतर दोन दिवसांनी सातबारा शेतकऱ्यांच्या हाती पडत असल्याचे चित्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे याकरिता शासनाने ई-पिक पाहणी ऑफलाइन करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सह देचली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देचली, इंदिरानगर, मुत्तापुर, मुक्कानपल्ली आसली, सिंदा, जगनगुडा या गावातील शेतकरी यांनी अहेरी तहसील कार्यालय चे तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन देऊन ई-पीक पाहणी ऑफलाइन करावी अशी मागणी केली आहे आहे.
विशेष म्हणजे शासनाने २१ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत भरडधान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत दिली आहे परंतु शेतकऱ्यांचे पीक पाहणी वर्जन हे डोकेदुखी ठरत असून शेतकऱ्यांचे आतापर्यंत ई-पिक पाहणी झाली नाही तर त्यांनी सातबारा घेऊन खरेदी केंद्रात ऑनलाईन नोंदणी कधी करणार हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे या मुदतीत धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रात होईल किंवा नाही हे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर आहे करीता या सर्व बाबींचा विचार विनिमय करून शासनाने त्वरीत उपाय योजना करावी अशी मागणी अजय कंकडालवार यांनी केली आहे.

धान विक्रीसाठी ऑनलाईन २१ ऑक्टोंबर ही शेवटची तारीख आहे शेतकऱ्यांनी संबंधित कार्यालयात ऑनलान अर्ज करावे सोबत सातबारा, आठ अ‌, आधार कार्ड, बँक पासबुक, हिस्सेदार असल्यास समतीपत्र घेऊन यावे ऑनलान नोंदणी करण्यासाठी शेतकरी उपस्थित राहणे अनिवार्य आहे असे उपप्रादेशिक कार्यालय अहेरी यांनी कळविले आहे

ज्या शेतकऱ्यांचे ऑनलाइन प्रणाली द्वारे ई -पीक नोंद झाली नाही अशा शेतकऱ्यांचे शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे तसेच काही शेतकऱ्याचे ऑनलाइन प्रणाली व तांत्रिक अडचणीमुळे नव्याने सातबारा वरती ई-पीक नोंद करण्यास अडचण होत आहे अशा शेतकऱ्यांचे यादी तयार करूण ही यादी आम्ही तहसील कार्यालय मार्फत शासनाकडे पाठवणार आहोत व ती मंजुरी करण्यासाठी आम्ही प्राधान्य क्रमाने घेत आहोत
-ओंकार ओतारी, तहसीलदार अहेरी

ई -पीक संदर्भात शासनाने जे निकष दिले ते गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे हे‌ अतिदुर्गम व आदिवासी बहुल आहेत व त्या गावात इंटरनेटची सुविधा नाही व तसेच या भागातील नागरिकांकडे मोबाईल नाही त्यातच मोबाईल सुद्धा हाताळता येत नाही करिता सर्व बाबींचा विचार करून शासनाने पूर्वीप्रमाणेच ई-पीक ऑफलाइन पद्धत सुरू ठेवावी जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार नाही याकरिता शासनाने लक्ष देऊन त्वरीत ई-पीक पाहणी ऑफलाइन करावी

– अजय कंकडालवार
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here