– महाप्रसादाचे केले वितरण
The गडविश्व
अहेरी : आलापल्ली येथील श्रीराम चौक येथे राम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रमाला आलेल्या भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले.
यावेळी आलापलीचे सरपंच शंकर मेश्राम, माजी जि.प.सदस्या सौ.अनिताताई आत्राम, आलापलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य विजय कुसनाके, जूलेख शेख आदि उपस्थित होते.