आलापल्ली-अहेरी-सुभाषनगर मार्गाची दुरूस्ती करा

202

– अहेरी नगर पंचायत अध्यक्षा करवेत यांची कार्यकारी अभियंता यांना निवेदनातून मागणी

The गडविश्व
अहेरी, ९ जुलै : हे तालुक्याचे ठिकाण आहे. आलापल्ली-अहेरी-सुभाषनगर मार्गावर तसेच अहेरी शहरातील अनेक मार्गावर खड्डे असल्याने याचा नाहक त्रास शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्यांची ७ दिवसाच्या आत दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी अहेरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा रोजा करवेत यांनी आलापल्ली सार्वजनिक ंबांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनातूनक केले आहे.
आलापल्ली- अहेरी हे महामार्ग असून या मार्गावर दिवसेंदिवस वर्दळ वाढत आहे. मात्र या मार्गावर खड्डे असल्याने अनेकदा अपघातही झाले आहे. तसेच आता शाळा सुरू झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर वसतीगृह असल्याने शालेय विद्यार्थी जात असतात मात्र रस्त्यावर असलेल्या खड्डयामुळे वाहतुक करणाऱ्या वाहनाव्दारे खड्डयातील पाणी उडण्याची शक्यत आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच खड्ड असल्याने अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच अहेरी शहरातील अतंर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले असल्याने याचा त्रास नागरिकाना करावा लागत आहे.
ही बाब लक्षात घेवून सदर आलापल्ली-अहेरी-सुभाषनगर व अहेरी अंतर्गत येत असलेल्या रस्त्यांची ७ दिवसाच्या आत दुरूस्ती करावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली येथे साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा अहेरी नगर पंचायत अध्यक्षा रोजा करवेत यांनी निवेदनातून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here