आरमोरी येथे निघाली भव्य तिरंगा रॅली

129

The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : आरमोरी- स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त आरमोरी येथून घोषवाक्याच्या निनादात नगर परिषदेच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.तत्पूर्वी आरमोरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पवन नारनवरे उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, आरमोरीचे तहसीलदार कल्याण कुमार डहाट, मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे, आरोग्य सभापती भारत बावनथडे यांनी तिरंगा रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ‘भारत माता की जय ,’वंदे मातरम’ च्या जयघोषात ही रॅली नगर परिषदेपासून सुरुवात करण्यात येऊन राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यावरून काढण्यात येऊन या रॅलीची सांगता आरमोरी येथील हितकारणी शाळेच्या क्रीडा संकुल मैदानात राष्ट्रगीताने करण्यात आली.
रॅलीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या रॅलीत अनेक शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी महात्मा गांधी, शिवाजी महाराज , सावित्रीबाई फुले, जिजाबाई, भगतसिंग डॉ. आंबेडकर , राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा करून रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे ते या रॅलीचे खरे आकर्षण बनले होते.
या रॅलीत आरमोरी शहरातील आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, ठाणेदार मनोज काळबांडे, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कुमार कोकुडे, नगरपरिषदप्राचार्य पाचपांडे, प्राचार्य अद्दलवार, प्राचार्य केशवन कवंडर प्राचार्य वठे, शेंडे,च महिला व बालकल्याण सभापती सुनीता चांदेवार,बांधकाम सभापती सागर मने, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, पं. स.चे माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी राजकुमार पारधी,तालुका होमगार्ड समादेशक अनिल सोमनकार, पत्रकार रुपेश गजपुरे, विलास चिलबुले,विस्तार अधिकारी सलामे, मडावी, नगरसेविका सुनीता मने, गीता सेलोकर , प्रगती नरनवरे, सिंधू कापकर,उषा बारसागडे ,कीर्ती पत्रे , निर्मला किरमे, पतंजली योग्य समितीचे सत्यनारायण चकिनारपवार,
तसेच आरमोरी येथील प्रतिष्ठित नागरिक,पोलीस स्टेशन आरमोरी येथील सर्व पोलीस कर्मचारी, आरमोरी शहरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ,होमगार्ड पथकातील सर्व होमगार्ड, सर्व शाळेचे प्राचार्य- शिक्षक वृंद, आरमोरी शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद, आरमोरी पंचायत समिती व तहसील कार्यालय येथील कर्मचारी वृंद, नगरपरिषद चे सर्व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.या तिरंगा रॅलीच्या यशस्वी आयोजनाकरिता कार्यालयीन अधीक्षक आशिष हेमके, नगर अभियंता अविनाश बंडावार, विद्यूत अभियंता कौस्तुभ रोकमवार, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता नितीन गौरखेडे, शहर समन्वयक गुलशेर पठाण, नगर परिषद कर्मचारी सुधिर सेलोकर, गिरीश बांते, मोहन कांबळे, सुनील कांबळे, राजु कांबळे, योगेश दुमाने, ज्ञानेश्वर दुमाने, भास्कर टिचकुले, अविनाश गाढवे, यांनी तसेच महीला कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here