आरमोरी : पुरपीडित शेतकरी अद्यापही नुकसान भरपाई पासून वंचित

286

– पूरपरिस्थितीने शेत अजूनही पडीतच
The गडविश्व
ता.प्र. / आरमोरी ‌, १ ऑक्टोबर : यंदा आलेल्या मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी ३ वेळा वैनगंगा नदिला सोडण्यात आल्याने वैनगंगा व तीला जोडणाऱ्या उपनद्यांच्या काठावरील शेतीला जोरदार पुराचा फटका बसला असून त्या शेती अजुनही पडीतच असल्याचे चित्र असून शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाई पासूनही अद्याप वंचित आहेत.
यंदा मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला. आरमोरी तालुक्यातील काही शेत पाण्याखाली आले होते यामुए शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र पुरपीडित शेतकऱ्यांना आद्यपही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांची विचारणा केली सांगितले. तसेच धान पीक तर पुराणे गेले परंतु शेवटपर्यंत आलेल्या पावसाने शेती चा ओलावा कायम आहे. कडधान्य तरी पेरायला मिळते की नाही याचा विचार शेतकरी करीत आहेत. सप्टेंबरमध्ये नुकसान भरपाई शासनातर्फे मिळणे अपेक्षित होते मात्र मिळाले नाही. तरीही शेतकरी नाराज होऊन “येईल दया तर दाखविल माया” म्हणुन समाधान व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here