आरमोरी : धान खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

398

The गडविश्व
ता.प्र. नरेश ढोरे (आरमोरी), ३ ऑक्टोबर : आधारभूत धान खरेदीची नोंदणी पुर्वतयारी म्हणून आज सोमवार ३ आक्टोबर सकाळी ९ वाजता पासून सातबारा व अर्जाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून लागणारी कागदपत्रे घेऊन शेतकरी कालपासूनच राजीव भवन परिसरात मुक्काम ठोकुन होते. आज सकाळी ०९.०० वाजता नोंदणी प्रक्रिया सुरू होताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली.
आरमोरी केंद्रांतर्गत येणारे आरमोरी, शिवणी, सायगाव, वाघाळा, अरसोडा, रवि, मुलुरचक, पालोरा, अंतरजी, आष्टा, कासवी, पळसगाव, पाथरगोटा, शंकरनगर, नवरगाव, रामपुर, ठाणेगाव, व, डोंगरगाव, आदी गावातील शेतकऱ्यांनी लागणारे कागदपत्रे, अर्ज २ प्रति सामायीक शेती असल्यास संमतीपत्र, २२_२३ चा पिक पेरा असलेला सातबारा, नमुना आठ, आधारकार्ड , बैंक पासबुक , झेरॉक्स, प्रत जोडुन राजीव भवन येथे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here