The गडविश्व
ता. प्र / आरमोरी (नरेश ढोरे ) २ नोव्हेंबर : स्थानिक नगरपरिषदेचे नगरसेवक तथा काँग्रेसचे युवा कार्यकर्ते मिलिंद खोब्रागडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
नवनियुक तालुका काँग्रेस कमिटीचे आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी मंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा निरीक्षक डॉ. एन. डी. किरसाण, माजी जिल्हा अध्यक्ष तथा प्रदेश सचिव डाँ. नामदेव उसेंडी , माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, माजी जिल्हाध्यक्ष हसन अली गिलानि, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे यांना दिले आहे.
मिलिंद खोब्रागडे यांची आरमोरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समशेर खा पठाण, अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सेवादल जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी, माजी तालुका अध्यक्ष मनोज वनमाळी, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष वृंदाताई गजभिये, माजी जि. प. सभापती आनंदराव आकरे, माजी प.स. सभापती अशोक वाकडे, माजी जि. प. सदस्या मनीषाताई दोनाडकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम, माजी जि. प.सभापती विश्वास भोवते, आदिवासी काँग्रेसचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विजय सुपारे, ऍड. विजय चाटे, शहर अध्यक्ष शालिक पत्रे ,यु.का विधानसभा अध्यक्ष अक्षय भोवते , नगरसेवक तथा गटनेते सुदाम मोटवानी, नगरसेविका निर्मला किरमे, उषा बारसागडे, दुर्गा लोणारे , कीर्ती पत्रे, भीमराव बारसागडे,ता.म.अध्यक्ष मंगला कोवे, विश्वेश्वर दररो, मंगरू वरखडे, आनंदराव राऊत, दत्तू सोमणकर, राजकुमार नंदरधने, माजी जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम ,नरेश टेंभुर्णे, तुळशीदास काशीकर, महादेव मडकाम, विनायक मडावी, हितेश कुंमरे, शिवाजी तादाम,रामभाऊ हस्तक, माजी पंचायत समिती सदस्य किरण मस्के, तुकाराम वैरकर, सत्यवान वाघाडे, नामदेव सोरते, भोलानाथ धानोरकर, निलेश अंबादे, मुखरू देशमुख ,गोलू वाघरे ,स्वप्निल ताडाम, राजू नैताम, नीलकंठ गोहणे ,प्रवीण रहाटे, अंकुश गाढवे, सारंग जांभुळे, श्रीकांत वैद्य, युवराज बोरकर, साबीर शेख, रुपेश जंजाळकर, मंगेश पाटील, सुरज भोयर ,सुरज सोमनकर, नितीन खोब्रागडे, पंकज सोमणकर, सतीश खोबरागडे ,मंगेश खोब्रागडे तथा आरमोरी तालुक्यातील सर्व काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
यापूर्वी खोब्रागडे यांनी एन. एस. यु .आय. तालुका अध्यक्ष पद, यु.का विधानसभा महासचिव, यु.का विधानसभा अध्यक्ष आदी पदावर काम केले असून काँग्रेसच्या ऑनलाइन सदस्य नोंदणी मध्ये महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकाविला होता.त्यांच्या याच प्रामाणिक कार्याची दखल घेऊन त्यांची काँग्रेसच्या आरमोरी तालुकाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे.आरमोरी तालुक्यात काँग्रेसची बांधणी बळकट करणार असल्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली.