The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत ९ ते १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्याने स्थानिक गडचिरोली नगर परिषदेतर्फे शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराला शहरातील नागरिकांनी तसेच नगर परिषदेचे सर्व कर्मचारी यांनी उपस्थिती दाखवून रक्तदान व आरोग्य तपासणी करून घेतली व उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी चंदन पांडे, बबन चौधरी, स्वप्नील घोसे, तुषार किरमे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम न. प.मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.