आज माँ दंतेश्वरी दवाखान्यात मेंदूविकार ओपीडी

185

The गडविश्व
गडचिरोली, २३ जुलै : जिल्ह्यातील चातगाव येथील सर्चमधील माँ दंतेश्वरी दवाखान्यात प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी मेंदूविकार ओपीडीचे आयोजन केल्या जाते. त्याअनुषंगाने आज २३ जुलै रोजी या ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्च(Serch) तर्फे करण्यात आले आहे.
आजकाल समाजामध्ये असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे आणि स्ट्रोक (अर्धांगवायू/पॅरालिसिस) सारखे मेंदुविकार अकस्मात होणाऱ्या मृत्युसाठी कारणीभूत ठरत आहेत. गडचिरोली सारखा दुर्गम भाग सुद्धा या सदृश्य आजारांना अपवाद नाही. समाजाची ही गरज लक्षात घेता, सर्च हॉस्पिटल मध्ये ही Neurology ओपीडी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येत असून मेंदूविकार तज्ञ डॉ ध्रुव बत्रा ही सेवा पुरवण्यात येत आहे. या ओपीडी मध्ये स्ट्रोक बरोबरच झटक्यांचा (मिरगी) आजार, विविध मज्जातंतू चे आजार, पार्किन्सन आजार, अल्जायमर आजार, जुनाट डोके दुखी, लहान मुलांचे मेंदूचे आजार, चक्कर येण्याचे अनेक आजार, मद्यपाणामुळे होणारे मेंदुविकार अशा अनेक आजारांवर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे. तसेच ही सुविधा जिल्ह्यातील जनतेसाठी अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जात आहे. अशी सुविधा गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच उपलब्ध होत असून या सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा, असे आवाहन सर्च तर्फे करण्यात आले आहे.

#serch #gadchiroli #chatgao

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here