अहेरी-वांगेपल्ली येथील ले-आऊटधारकांकडून नियमाबाहयरित्या झालेल्या बांधकामाची चौकशी करा

240

– माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
The गडविश्व
गडचिरोली : अहेरी-वांगेपल्ली येथील ले- आऊटधारकांकडून नियमाबाहयरित्या झालेल्या बांधकामाची चौकशी करून शासनाने केलेल्या बांधकामाची ले आऊट धारकांकडून खर्च वसुल करण्यात यावा अशी मागणी माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
उपविभाग अंतर्गत अहेरी-वांगेपल्ली येथील सन २००१ ते आजपावेतो टाकण्यात आलेली संपूर्ण ले-आऊटची चौकशी करण्यात यावी. तसेच उपविभाग अंतर्गत शासनाने जे अकृषक जमीनीचे आदेश पारीत केले त्या आदेशामध्ये जे नियम व अटी लागू करण्यात आले होते त्या आदेशाच्या उल्लंघन करुन आपल्या उपविभागातंर्गत अहेरी-बांगेपल्ली येथे नियमाबाहय ले-आऊट टाकण्यात आलेले आहे . सदर ले-आऊटमध्ये भुखंड धारकांनी खुली जागा अंतर्गत रस्ते व रस्त्याच्या बाजुची गटारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमाणकाप्रमाणे संबंधीत ले-आऊट विकसीत करून नगर पंचायत, अहेरी यांच्या ताब्यात द्यायचे होते, परंतु तसे न करता शासनाकडून आलेलय निधीचा वापर करुन रस्ते, नाले, गटारेची बांधकाम करण्यात आले. सदर ले-आऊट नियमाबाहयरित्या झालेल्या बांधकामाची सखोल चौकशी करुन ले-आऊटधारकांकडुन शासनाकडून झालेल्या खर्च वसुल करण्यात यावी व ले -आऊटधारकांवर सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here