अहेरी तालुक्यातील मुस्लीम समाज कब्रस्तान व इदगाह चा कायापालट होणार : जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार

527

– मुस्लीम समाज कब्रस्तान व इदगाह ला भेट देत केली पाहणी
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील मुस्लीम समाज कब्रस्तान व इदगाह चा कायापालट होणार आहे. काल जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मुस्लीम समाज कब्रस्तान व इदगाह ला भेट दिली यावेळी जि. प. अध्यक्षांना तेथील विविध विकास कामांची मागणी करण्यात आली यावेळी जि. प. अध्यक्षांनी सदर मागणी पूर्ण करून देऊ असे शब्द दिले. त्यामुळे आता मुस्लीम समाज कब्रस्तान व इदगाह चा नक्कीच कायापालट होणार आहे.
अहेरी तालुक्यातील मुस्लीम समाज युवकांनी पुढाकार घेऊन अनेक समस्या घेऊन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार, शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख, नवनियुक्त अहेरी नगर पंचायत उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांना विकास कामे करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. काल २७ फेब्रुवारी रोजी कब्रस्तान व इदगाह ची पाहणी केली. यावेळी युवकांनी सिमेंट काँक्रिट रस्ते, बोअरवेल, शेड, इदगाह वाल कंपाऊंड, हॉयमॅक्स पददिवे असे अनेक प्रकारचे विकास कामांची मागणी करण्यात आली यावेळी प्रामुख्याने जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नक्कीच आपली मागणी रास्त आहे आपण केलेल्या मागणीला पूर्ण करू आपल्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहे तसेच नगर पंचायत अहेरीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन सारखे अनुभवी व्यक्ती असल्यामुळे विकास काम नक्कीच करू असे आश्वासन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले. यावेळी प्रामुख्याने माजी नगर पंचायत सदस्य जावेद शेख, शकील शेख, आफताब शेख, सलमान शेख, सलाम शेख, श्याम ओंडरे, प्रशांत गोडसेल्वार, सय्यद भाई, तब्बू शेख, असे अनेक मुस्लीम युवक उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here