अहेरी तालुक्यातील बहुचर्चित राजाराम ग्रामपंचायतीवर आविसचा झेंडा

209

– सरपंचपदी नागेश कन्नाके विराजमान

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील १४ ग्राम पंचायत मध्ये पोटनिवडणूक पार पडली. यामध्ये महत्वाची ग्राम पंचायत होती राजाराम. राजाराम ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणुका २०१८ सालीच झाले. मात्र सरपंचाची निवड हि थेट जनतेतून कार्याची होती. राजाराम ग्राम पंचायत मध्ये ९ सदस्य व थेट सरपंच अशी निवडणुक पार पडली होती . त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या समर्पित थेट सरपंच व आठ सदस्य निवडुन आले होते.
मात्र स्थानिक राजकारणात विरोध झाल्याने अडीच वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने सरपंच व सहा सदस्यांचे पद रिक्त झाले. त्यामुळे सहा सदस्यांसाठी पोट निवडणुक घेण्यात आली होती.
आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जि.प सदस्य अजय नैताम यांच्या नेत्रुत्वात निवडणुका पार पाडले होते. या निवडणुकीत आविस कडून नागेश कन्नाके, सौ.सपना तलांडे, कु.प्रिया पोरतेट असे तीन सदस्य निवडून आले होते तर आविसचे उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर व सदस्य नारायण काम्बगौनिवार यांचे पद कायम होते त्यामुळे आविसचे असे पाच सदस्यांना बहुमत असल्याने राजाराम ग्राम पंचायत वर आविसच्या झेंडा फड़कला आहे.
विशेष म्हणजे राजाराम गाव अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांचे मूळ गाव असुन त्यांची अर्धांगीनी सौ.सपना भास्कर तलांडे ह्या निवडणुकीत उभ्या होत्या व निवडून आले. त्यामुळे सरपंच आरक्षण सर्वसाधारण असल्यामुळे विरोधाक चांगलेच विषय करत होते. मात्र सभापती यांनी आपल्या पत्नीला सरपंच ना करता आविसचे कट्टर कार्यकर्ते नागेश कन्नाके यांना सरपंच पदावर विराजमान केले.
सरपंच पदासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून सत्यवान आलाम यांनी नामनिर्देशन पत्र भरले मात्र बहुमत आविसचे असल्याने सरपंच आविसचा बसला.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, राजारामचे उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकुदर, ग्राम पंचायत सदस्य नारायण कबौगिनीवार, प्रिया पोरतेट, माजी सरपंच जोतीताई जुमानके, पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम, उपसरपंच संजय पोरतेट, सामाजिक कार्यकर्ता अँड.हनमंतू आकदर,चंदुरशाही आलाम, राकेश सड़मेक, दिपक अर्का, मनोज आकदर, जयराम दुर्गे, प्रभाकर पोरतेट, मधुकर पोरतेट, सीताराम आत्राम, सुरेश सोयाम, अरविंद परकीवार, प्रकाश कबोगोनीवार, स्वामी आत्राम, मोरोती पोरतेट, मारोती मडावी, वसंत सड़मेक, मुंशीराम आत्राम, जितेंद्र पंजलवार, येर्रा पोरतेट, यशवंत कन्नाके, योगेश कन्न्नाके, सुधाकर गोंगले, व्येंकटेश आलोने, प्रवीण पेँदाम, नरेंद्र गर्गाम, आदि उपस्थित होते.
या निवडणुकीला अध्याशी अधिकारी म्हणून नायब तहसीलदार डी.खोत, दशरथ आत्राम, विपुल, तलाठी मडावी, ग्राम सेवक पी.झाडे. व महसूल कर्मचारी व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here