– माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
अहेरी, ११ ऑगस्ट : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा रास्त भावाने धान्य वितरित केले जाते. मात्र अहेरी तालुक्यातील अनेक गावे धान्य पुरवठा पासून वंचित असून याची दखल माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार घेतली आहे व तात्काळ धान्य पुरवठा करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा रास्त भावाने धान्य वितरित करण्यासाठी दरमहा २५ तारखेपर्यंत रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा होणे आवश्यक असते. असे असतांना अहेरी तालुक्यातील अनेक रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही त्यामुळे रास्तभाव दुकानांमार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना धान्याचे वितरण रखडले आहे. धान्याचा लाभ केव्हा मिळणार याबाबत शिधापत्रिकाधारक लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी तसेच एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना दरमहा गहू, तांदूळ, साखर, तूर डाळ, हरभरा डाळ इत्यादी धान्याचे वितरण करण्यात येते. मात्र मागील जून महिन्यापासून अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा, गोंविंदगाव, मेडपल्ली कोठारी, चंद्रा, कोरली, देवलमरी, अबनपल्ली, रेपनपल्ली, ताटिगुदम, गुंडेरा, रसपल्ली, आलदंडी, मोदुम्तूरा, उमानूर, पुसूकपल्ली, जिमलगट्टा, अर्कापल्ली, मेडपल्ली वेलादी, गडबामणी, चेरपल्ली, व्यंकटारावपेठ, दामरंचा, सन्ड्रा, पेरमिली, सुद्धागुदम, या गावांना धान्याची पुरवठा झालेल नसून वंचित आहे. ही बाब माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळताच त्यांनी प्रशासनाने तात्काळ धान्य पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.