अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाची जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट घेऊन केली आर्थिक मदत

309

The गडविश्व
अहेरी , १६ सप्टेंबर : तालुक्यातील गुड्डीगुड्म येथील इसम व्येंकटी पापया चौधरी (६०) हे आज १६ सप्टेंबर या सकाळी जंगलात शेळी चराईसाठी गेले असता जंगलात ठान मांडून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले. दरम्यान प्रसंगावधान राखत अस्वलाच्या तावडीतून सुटका केली. त्यांच्यावर अहेरी येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.
सदर घटनेची माहिती जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहीत होताच त्यांनी रुग्णालयात भेट देऊन विचारपूस करून आर्थिक मदत केली. तसेच वनविभागाकडून त्वरित मदत मिळवून देण्यास सहकार्य करणार असे आश्वासन दिले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प.सदस्यअजय नैताम, वनरक्षक आर.सोयाम, श्रीनिवास राऊत, कार्तिक तोगम, सतीश चौधरी व नातेवाईक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here