The गडविश्व
सावली, २ ऑगस्ट : तालुक्यातील असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या रोवणीकरिता,बाशी करीता, लवकर सोडावे असे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी असोलामेंढा प्रकल्पाचे मुख्यअभियंता सोनुणे यांनी दिले.
तालुक्यामधील शेतकऱ्यांनी रोवण्याच्या कामाला जोराने सुरुवात केलेली आहे परंतु चार, पाच दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतीच्या बांधावर रोवण्याकरिता पाणी नाही. खासदार अशोक नेते हे दिल्ली येथे अधिवेशनात असल्याने हि बाब दिवाकर गेडाम यांनी या खासदार अशोक नेते यांना लक्षात आणून दिल्यानंतर असोलामेंढा प्रकल्पाचे मुख्यअभियंता सोनुणे यांना लवकरात लवकर असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या रोवणीसाठी सोडा असे निर्देश दिले.
मुख्यअभियंता सोनुणे यांनी कापशी मायनरवरील काही काम चालु असल्याने लवकरच दुरुस्त करून या दोन-तीन दिवसात पाणी सोडले जाईल असे सांगितले. त्यावेळी सोनोने यांनी तालुक्याच्या विभागामध्ये पाणी वापर संस्थेने मागणी अर्ज करावे लागते त्यानुसार शेतकऱ्याच्या मागणीनुसार आम्हाला लवकर पाणी सोडता येईल असे एक सूचित केले.