‘या’ पद्धतीने द्या गोंडवाना विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा : नवीन परीक्षार्थीने जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

179

– १९ जानेवारी पासून विविध अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन परीक्षा

THE गडविश्व
गडचिरोली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील हिवाळी २०२१ च्या १० जानेवारी पासून होणाऱ्या लेखी परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या त्यानंतर परीक्षा ही संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार १९ जानेवारी पासून ऑनलाईन MCQ (बहुपर्यायी) पद्धतीने पार पडणार असल्याचे विद्यपीठाचे कुलसचिव तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.चिताडे यांनी परिपत्रक जारी करून विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, प्राचार्य व संबंधित विद्यार्थ्यांना कळविले आहे.
सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्याने यावर्षी नव्यानेच प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनामध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. परीक्षा ऑनलाईन कशापद्धतीने द्यायची, परीक्षा मोबाईल मध्ये देता येणार काय, परीक्षा कुठे देता येणार अशाप्रकारचे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहेत.
मात्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांची सोय करून दिली आहे. विद्यापीठाच्या https://unigug.ac.in/ या संकेतस्थळावर परीक्षा कशा पध्दत्तने द्यायची याबाबत एक व्हिडीओ स्वरूपात मार्गदर्शक विडिओ दिला आहे.

विद्यापीठाच्या https://unigug.ac.in/ या संकेतस्थळावर गेले असता ONLINE SERVICES QUICK LINK या ठिकाणी Demo Video for Summer 2020 Exam यावर क्लिक केले असता परीक्षा संबंधित व्हिडीओ दिलेला आहे.
या विडिओ मध्ये परीक्षार्थी परीक्षा देताना कोणती खबरदारी घेईल, परीक्षा देण्यास कोणत्या संकेतस्थळाचा वापर करायचा इत्यादी सर्व प्रश्नाचे निराकरण व्हिडियोच्या माध्यमातून होणार आहे. नवीन परीक्षार्थी असल्यास त्यांनी अवश्य व्हिडीओ पाहून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया समजावून घ्यावी.

ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची त्याबाबत व्हिडीओ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here