-मिचगाव ग्रामपंचायत कार्यालयात बैठक
The गडविश्व
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मिचगाव ग्राप मध्ये मुक्तिपथ ग्रामपंचायत समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार समितीचे पुनर्गठन करण्यात आले. समितीने अवैध दारू व तंबाखूविक्री बंदी हेतू सक्रीयपणे काम करावे, यासाठी समितीच्या सर्व सदस्यांना मुक्तिपथ कार्यकर्त्याद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
या बैठकीत गावातील अवैध दारू व तंबाखूविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली. ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावातील दारूबंदी गावसंघटन सदस्यांची ओळख, त्या गावात दारू व अवैध तंबाखूविक्री सुरु आहे का ?, सुरु असल्यास विक्रेत्याची माहिती, विक्री बंदीसाठी कृतीचे नियोजन, पोलीस तक्रार, दारू व तंबाखू विक्रीबंदी व निगडीत कायद्याची ओळख करून देण्यात आली. यामध्ये मुंबई दारुबंदी कायद्यातील प्रमुख कलम, अल्पवयीन मुलांचा संरक्षण कायदा, पेसा कायदा, साथरोग कायदा, सुगंधित तंबाखूबंदी कायदा, महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, ग्राप अधिनियम ३७ नुसार ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच, ग्रामसेवक, सर्व सरकारी कर्मचारी यांचे दारू विक्री बंदीबाबत अधिकार व कर्तव्य काय आहेत आदींची सविस्तर माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी सरपंच ज्योत्सना कोवे, पोलिस पाटील चुनाजी राऊत, ग्रामसेवक के.जी. नेवारे, गाव संघटन सदस्य बाबुराव नरोटे, सुधा आगळे, प्रशांत पुंघाटे, गोविंदा कोडाप, प्रमोद कोवे, रामचंद्र कुरेशी, सिंधू मडावी, रूपा कन्नाके, वाकडे, रणदिवे, प्रफुल कोडाप आदी उपस्थित होते.