अरततोंडी शेतशिवारातून ३५ हजाराची मोहा दारू जप्त

155

– कुरखेडा पोलिसांनी टाकल्या दोन ठिकाणी धाडी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, २३ नोव्हेंबर : स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीचा आधारे शुक्रवारी अरततोंडी शेतशिवारात धाड टाकून दोन ठिकाणी सूरू असलेली मोह फुलाची हातभट्टी उध्वस्त करीत ३५ हजारांचा मोह सडवा व दारू जप्त केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अरततोंडी शेतशिवारात असलेल्या जंगलाच्या आडोशाने मोह फूलाची अवैध हातभट्टी लावून दारू गाळत त्याची विक्री करण्यात येत असल्याची गोपिनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांनी पोलीस पथक गठीत करून या ठिकाणी धाड टाकली असता शेतशिवारातील वनतलावाच्या पाळीवर असलेल्या झूडपात एक अवैध दारूची हातभट्टी दिसून आली. दरम्यान येथून ३० लिटर क्षमतेच्या ४ मातीच्या मडक्यात १२ हजार रूपये किंमतीचा मोह सडवा व एका प्लास्टीक कॅनमध्ये ४ हजार रूपये किंमतीची २० लिटर मोह दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपी भारत चंदर गेडाम रा. अरततोंडी याला अटक केली.
तर येथून जवळच सूरू असलेल्या पून्हा एका अवैध हातभट्टीवर धडक देत येथून ५० लिटर क्षमतेचा दोन प्लास्टीक ड्रम व ३० लिटर क्षमतेचा ३ मडक्यात भरलेला १९ हजार रूपये किंमतीचा मोहसडवा जप्त केला व आरोपी महेश मनोहर गेडाम (३१) याला अटक केली. दोन्ही आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देवराव भांडेकर, पोलीस हवालदार अनिल वरखेडे, पोलीस नाईक राजेंद्र कवालीया, पोलीस शिपाई संदीप वासेकर, धनंजय लाकूडवाये यांचा चमूने केली.

#arattondi #kurkheda #gadchiroli #crime news # gadchiroli news #moha daru #kurkheda police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here