The गडविश्व
गडचिरोली, १८ ऑगस्ट : महिला व बाल विकास विभाग,सखी वन स्टॉप सेंटर,गडचिरोली च्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या निमित्त १३ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे प्रसुती कक्षामध्ये ६० महिलांना फळ वाटप करण्यात आले.
डॉ. सुशिल इंगळे यांचे हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली येथील कर्मचारी सुजाता बोलीवार, अतुल कुनघाडकर, लोमेश गेडाम, विनोद दातार व आशा गेडाम यांनी सहकार्य केले. तसेच सदर उपक्रमाला प्रामुख्याने जिल्हा महिला व बाल रुग्णालय,गडचिरोली येथील परिचारिका स्वीटी नवघरे उपस्थित होत्या.
