अबब… ! चक्क सूरजागडच्या लोहदगडाने बुजविले रेपनपली जवळील खड्डे

1676

– माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सुरजागडवर केला रोष व्यक्त
The गडविश्व
अहेरी, ३ सप्टेंबर : एटापली तालुक्यातील सूरजागड येथील लोहखनिज घेवुन दररोज मोठमोठे ट्रक वाहतूक करत असतात त्यामुळे आलापल्ली-आष्टी रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असू रस्त्यावर पूर्णपणे खड्डे पडून वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. मात्र आलापल्ली- सिरोंचा मार्गांने शुद्ध सदर वाहतूक सुरू असून काल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार हे दामरंचा येथे जात असताना रेपनपली जवळ ट्रक खड्ड्यात अडकला होता तेव्हा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांनी स्वतः जेसीपी बोलून लोहखनिज घेवून जाणाऱ्या ट्रक मधील लोहदगड सदर रस्त्यावर वरील खड्ड्यात टाकुण मार्ग मोकळा केला. व सुरजागड येथे लोहखनिज वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण होत असल्याने सुरजागडप्रती रोष व्यक्त केला.
यावेळेस माजी प.स.सभापती भाष्कर तालांडे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, आलापल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक अग्रवाल भय्या व इतर नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here