अबब…किराना दुकानातून दारूविक्री, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

574

– कुरखेडा पोलिसांनी धड टाकत साडेबारा हजारांचा मुद्देमालमी केला जप्त

The गडविश्व
गडचिरोली : कुरखेडा शहरातील एका किराणा दुकानातून दारूविक्री करणाऱ्याच्या कुरखेडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सदर कारवाई बुधवारी करण्यात आली. घटनास्थळावरून १२ हजार ५०० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करीत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल कमलदास मनुजा असे विक्रेत्याचे नाव आहे.
शहरातील बाजारात असलेल्या एका किराणा दुकानातून अवैध दारूविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिस व मुक्तीपथ चमूने सदर दुकानात जाऊन चौकशी केली असता किराणा साहित्यांच्या आड अवैध दारूविक्री होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ३१ विदेशी दारूच्या निपा, २१ बिअर व ५० देशी दारूच्या टिल्लु चा समावेश आहे. याप्रकरणी विशाल मनुजा नामक दारूविक्रेत्यावर कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार उराडे यांनी केली. यावेळी मुक्तीपथ चे उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक मयूर राऊत, प्रेरक विनोद पांडे, राकेश ढवळे उपस्थित होते.

डीप्रा टोला येथे देशी दारू नष्ट

कुरखेडा शहरानजीकच्या डीप्रा टोला येथील तीन दारूविक्रेत्यांच्या घराची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन घरी जवळपास ३ हजार ६०० रुपयांची ७१ टिल्लू देशी दारू मिळून आली. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत पुन्हा अवैध दारूविक्री न करण्याची तंबी देण्यात आली. आपण या व्यवसायातून बाहेर पडण्याची ग्वाही दारूविक्रेत्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here