अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्यासह तिघांना शौर्य चक्र

962

The गडविश्व
गडचिरोली,१५ ऑगस्ट : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू (president smt droupadi murmu) यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दल आणि CAPF जवानांसाठी सन्मान आणि पुरस्कार मंजूर केले आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील तीन पोलिसांना शौर्य चक्र (shoury chakra) जाहीर करण्यात आले आहे.
त्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे (somay mundhe) यांच्यासह पोलीस नाईक रवींद्र काशिनाथ नैताम (ravindr kashinath naitam), पोलीस नाईक टिकाराम संपतराव काटेंगे (tikaraam ssmpartrao katenge) यांचा समावेश आहे.
पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणूकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणा­ऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दल आणि CAPF जवानांसाठी सन्मान आणि पुरस्कार मंजूर केले आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या तीन पोलिसांना शौर्य चक्र जाहीर केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांविरुद्ध कारवाई करतांना उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्यासह पोलीस नाईक रवींद्र काशिनाथ नैताम, पोलीस नाईक टिकाराम संपतराव काटेंगे यांना शौर्य चक्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.  नोव्हेंबर २०२१ मध्ये २६ नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला होता. यावेळी नक्षल्यांचा मोरक्या मिलिंद तेलतुंबडे त्या चकमकीत ठार झाला होता. यासाठीच तिघा पोलिसांना शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे. नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलिसांचा आता सन्मान केला जाणार आहे.
शौर्य चक्र ने सन्मानित होत असल्याने गडचिरोली पोलीस दलाचे वतीने त्यांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी कौतुक केले असुन त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

गडचिरोली पोलीस दलातील ४१ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक व २ जवानांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी मिळाले पोलीस पदक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here