अनोळखी नंबर वरून फोन आल्यास आता त्या व्यक्तीचे नाव दिसणार : ट्राय करणार लवकरच सेवा सुरू

292

– भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच एक महत्वाची सेवा सुरू करणार
The गडविश्व
नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर : आपल्या मोबाईल फोन मध्ये सेव असलेल्या नंबर शिवाय अनोळखी नंबर वरून फोन आल्यास तो आपण उचलण्यास टाळतो अथवा दुर्लक्ष करतो. मात्र आता यापासून तुमची लवकरच सुटका होणार आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्राय (TRAI) आता लवकरच एक महत्वाची सेवा सुरु करणार आहे. त्या सेवेने अनोळखी मोबाईल नंबरपासून तुमची सुटका होण्यास मदत होणार आहे. नाव मोबाईल फोनमध्ये सेव केलेले नसेले तरी नाव दिसणार आहे.
आता भारत सरकारकडून एक अशी सुविधा अमंलात आणली जाणार आहे. त्यामुळे तुमची अनोळखी नंबरपासून सुटका होणार आहे. आता जो व्यक्ती तुम्हाला फोन करेल त्याचे नाव मोबाईल फोनमध्ये सेव केलेले नसले तरीही ते तुम्हाला दिसणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी (KYC) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. याशिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना फोन केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here