अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्या : खा.अशोकजी नेते

191

– लोकसभेच्या संसदेच्या अधिवेशनात ३७७ मधील नियमात प्रश्न उपस्थित केला.
The गडविश्व
गडचिरोली, १ ऑगस्ट : गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हि जिल्हे प्रामुख्याने भात उत्पादक म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यामध्ये मागील दहा ते पंधरा दिवस सततच्या संतधार पाण्याने अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक धरणे, तलाव, नदी, नाले तसेच गोसीखुर्द, आसोलामेंढा, संजय सरोवर, मेडिगट्टा प्रकल्प, इत्यादी हि धरणे तुटुंब भरल्याने सततच्या पावसाने व धरणाचे पाणी सोडल्याने अनेक नद्यांना महापूर येऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊन तसेच ग्रामीण भागात घरामध्ये पाणी शिरून अनेक नागरिकांचे घरे पडले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत देण्यात यावे असा प्रश्न खा.अशोकजी नेते यांनी लोकसभेच्या संसदेच्या अधिवेशनात ३७७ मधील नियमात उपस्थित करता मागणी केली.
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात या वर्षी सततच्या पावसाने व अतिवृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हि अतिवृष्टी १९८६ मध्ये झाली त्यापेक्षाही यावर्षी अतिवृष्टी जास्त प्रमाणात होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची धान्याची पिके धान्य (भात) सोयाबीन, कापूस इत्यादि पिके नष्ट होऊन खूप मोठ्या प्रमाणात या पिकांची नुकसान होऊन दुबार पेरनीची संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अंदाजे ५० गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांची घरे पडून घराचे, दुकानाचे, व इतर सामानाचे नुकसान झालेले आहे.तसेच ३००० पेक्षा जास्त नागरिकांना पुरामध्ये अडकल्यांना सुरक्षा स्थळी हलवण्यात आले.
तसेच कोरोना महामारीच्या संकटामुळे व एकीकडे अतिवृष्टीने शेतकरी हा हवालदील झालेला असून शेतकऱ्यांना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जसे शेतकऱ्यांच्या मुलाचे शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी, लग्नकार्य, या विवेचन शेतकरी अडकला आहे. त्यासाठी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते यांनी लोकसभेच्या संसदेमध्ये ३७७ नियमात प्रश्न उपस्थिती केला आहे.
त्यामुळे अतिवृष्टीने, सततच्या पावसाने, पुराने नुकसान झालेल्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना त्वरित मदत द्या अशी मागणी खा.अशोकजी नेते यांनी अधिवेशनात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here