अखेर राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरले : ‘हे ‘ असणार गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री

1549

– जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी
The गडविश्व
मुंबई, २४ सप्टेंबर : राज्यात नवे सरकार स्थापन होऊन जवळपास तीन महिन्यांच्या अवधी लोटला मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची नेमणूक झाली नव्हती. मात्र आता अखेर मुहूर्त मिळाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. तसेच नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद देण्यात आले असून गिरीश महाजन यांची धुळे, लातूर, नांदेडवर बोळवण करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी –

राधाकृष्ण विखे पाटील – नगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील – पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे – सांगली,
संदिपान भुमरे – छत्रपती संभाजीनगर
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत – परभणी, धाराशिव
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here