अखेर गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदीला मुदतवाढ ?

267

– आमदार गजबेंच्या पाठपुराव्यास यश, माञ धान खरेदीवर प्रश्न चिन्ह ?
The गडविश्व
देसाईगंज : उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यातील रखडलेल्या धान खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी या मागणीला घेऊन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीला ३१ मार्च पर्यंतच मुदतवाढ देण्यात आल्याने आमदार गजबेंच्या प्रयत्नांना यश आले असले तरी एकुणच धान खरेदीवर प्रश्न चिन्ह लावल्या जाऊ लागले आहेत.
पणण हंगाम २०२१-२२ मध्ये धान खरेदी करीता १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत धान खरेदी करण्याबाबत शासन स्तरावरुन सुचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार धान खरेदी करणे अपेक्षीत होते. तथापी अभिकर्ता संस्थांकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार वारंवार मुदतवाढ देऊनही गडचिरोली जिल्ह्यातील १७ धान खरेदी केन्द्रावरील १० हजार १६६ नोंदणीकृत शेतकऱ्यांची धान खरेदी होऊ शकली नाही.
त्या अनुषंगाने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक ४०२०८ गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीला मुदतवाढ देण्या संदर्भात लावुन धरलेली मागणी व गडचिरोली जिल्हाधिकारी यांचे १४ मार्च २०२२ च्या पत्राच्या अनुषंगाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार यांच्या स्वाक्षरीनिशी ३१ मार्च २०२२ पर्यंत धान खरेदीस मुदतवाढ देण्याबाबतचे पत्र जारी करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील रखडलेल्या धान खरेदीला मुदतवाढ देण्यात आली असली तरी शेवटच्या दोन दिवसातच उर्वरित १० हजार १६६ शेतकऱ्यांची धान खरेदी होऊ शकणार काय ? असा प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.

राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका – आमदार गजबे
गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असुन अतिदुर्गम,अतिसंवेदनशील भागात वसलेला आहे.वाहतुक व गोदामाची पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने वारंवार धान खरेदी रखडली होती. केन्द्र शासनाने ३१ मार्च पर्यंत आधिच धान खरेदीस मुदतवाढ दिली असल्याने त्या अनुषंगाने राज्य शासनाने धान खरेदीत सातत्य ठेऊन ३१ मार्च २०२२ पर्यंत धान खरेदी सुरु ठेवावयास पाहिजे होती, मात्र असे न केल्याने राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराचा जबर फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. तथापी मिळालेल्या मुदतवाढीच्या मुदतीत शेतकऱ्यांनी संबंधित धान खरेदी केन्द्रावर धान विक्री करुन लाभ घेण्याचे आवाहन आमदार गजबे यांनी जिल्ह्यातील शेतक-यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here