अखंड तारकब्रह्म नाम कीर्तन व रासलीला उत्सवास जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन घेतले आशीर्वाद

139

The गडविश्व
मूलचेरा, ११ नोव्हेंबर : तालुक्यातील सुंदरनगर येथे परंपरागत सुरू असलेल्या प्रसिद्ध कीर्तन व रासलिला कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
श्री राधाकृष्ण सार्वजनिक भजन मंदिर तर्फे अखंड तारकब्रह्म नाम कीर्तन व रासलीला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी नेहमी प्रमाणे न चुकता आपल्या व्यस्त दैनंदिन कामजातून वेळ काढून कार्यक्रमाला भेट दिली व राधा कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी माजी जि. प. सदस्य रवीभैया शहा व मंदिर कमिटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here