गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या परीक्षा ‘या’ कालावधीत

144

The गडविश्व
गडचिरोली, २ ऑक्टोबर : जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट क मधील सरळसेवेने एकुण २३ संवर्गाची पदे भरावयाची आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील रिगमन, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (नि.श्रे.), लघुलेखक (उ.श्रे.) व कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या ८ संवर्गाच्या परिक्षा ह्या ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत.
सदर पदांकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीता जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध असुन सदर लिंकवर क्लिक करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच परिक्षेची मॉक लिंक व परिक्षेकरीता असणाऱ्या सुचनांचे माहिती पुस्तक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असुन उमेदवारांनी सुचनांचे काळजीपुर्वक वाचन करुन त्यावरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे व प्रवेशपत्रावर नमुद परिक्षा केंद्रावर नियोजित वेळी व दिवशी स्वखर्चाने हजर रहावे. असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here