जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे युवा कौशल दिवस साजरा

156

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १८ जुलै : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार १५ जुलै २०२३ ला जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुरजुसे, प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद भैसारे (लेन्ड-अ-हॅन्ड-इंडिया) तसेच व्यवसाय शिक्षक एच. एस. पठाण, किरण दरदे मॅडम, आणि इतर शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात कौशल्य विकास शिक्षण व व्यवसाय शिक्षणाचे फायदे व महत्त्व बद्दल मिलिंद भैसारे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कृषी व हेल्थकेअर दोन्ही वर्गांचे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here