–तंमुस अध्यक्ष राजू बारई यांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा पुतळ्याचे पूजन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा , १० ऑगस्ट : तालुक्यातील गेवर्धा येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाच्या वतीने आयोजित आदिवासी दिनानिमित्त क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळाचे पुजन तंटामुक्ति समिति अध्यक्ष राजु बारई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच झेंडा वंदन पो. पा. भाग़्यरेखा वझाडे यांनी केले.
जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करीत रैरॅली काढण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला सरपंचा सुषमा मडावी, ग्रा. प. सदस्य रोशन सय्यद, अध्यक्ष राजेंद्र कुमरे, व्यंकटि जी नागीलवार, तं. मुक्ति सदस्य सुधीर बाळबुध्दे, मडावी, मसराम, कोवाची, विट्ठल उईके, प्रभाकर कुलमेथे, नरेश पुसाम, संदीप दर्रो, सदाराम कवडो, सुनील कवडो, सदानंद कंगाली, पुरुषोत्तम कंगाली,आशीष सिडाम आणि समस्त आदिवासी बांधव व गावातील सर्व समाजातील मंडळींनी उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाला यशश्वी करण्यास मोलाचा योगदान दिला.