The गडविश्व
गडचिरोली, १० ऑगस्ट : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक आदिवासी दिनानिमित्त शाळेत वेगवेगळे नृत्य आणि गायन यांचे प्रदर्शन करून आदिवासी लोकांच्या चालीरीती आणि रुढी, परंपरा कशाप्रकारे जोपासल्या जातात यांचे सुंदर उदाहरण प्रस्तुत केले गेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार शिक्षिका प्रशांती वाघमारे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी आदिवासी दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तसेच आदिवासी दिवसाचे महत्त्व सांगितले. सदर कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य निहारिका मंदारे उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसह वर्गशिक्षकांनी वेगवेगळे नृत्य सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण श्रेय शाळेच्या प्राचार्य नेहरिका मंदारे यांना जाते. त्यांनी या कार्यक्रमाला मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकवर्गांना कार्यक्रमासाठी प्रोत्साहित केले आणि सर्वांचे आभार व्यक्त केले.