The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०२ : धानोरा येथे २०१५ पुर्वी ग्रामपंचायत होती त्यानंतर नगरपंचायत झाले. धानोरा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धानोरा येथे महसूल आबादीची खाली जागा दिसली की लोकांकडून त्याठिकाणी अतिक्रमण करून त्या जागेवर पक्के मकान बनविले जाते. धानोरा येथील सर्वे क्रमांक ५२५ या आबादी च्या बस स्टॅन्ड ला लागून असलेल्या जागेवर लोकांनी अतिक्रमण करून त्याठिकाणी झोपडी बांधून जागेवर अनेकांनी कब्जा केलेले आहे. अतिक्रमण केलेले आहे हे सर्वच महसूल किंवा नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांना माहित आहे तरी सुद्धा हे कर्मचारी अतिक्रमण करीत जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे का ? हे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी कोणाची आहे ? महसूल की नगरपंचायत ची ? तसेच त्या शासकीय जमिनीवर कब्जा करणाऱ्या लोकांचे अतिक्रमण काढून त्याठिकाणी नागरिकांसाठी मनोरंजन केंद्र बनवावे अशी मागणी होत आहे.