गडचिरोली येथील एमआयडीसी ग्राउंड कोटगल परिसरात ८ जुलै रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. दरम्यान या कार्यक्रमाला जिल्हाभरातून नागरिकांनी हजेरी लावली होती. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आणण्याची सोय करण्यात आली होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आदी उपस्थित होते. मात्र जेव्हा नागरिकांना बाहेर निघायचे होते तेव्हा मात्र नागरिकांना बाहेर निघण्यास मज्जाव आणण्यात येत होता. भाषण सुरू असताना नागरिक बाहेर निघत असतांना त्यांना बाहेर निघण्यास मनाई करण्यात येत होती तर दोन मिनिटे थांबा असे असे सांगण्यात येत होते ते व्हिडीओ मध्ये कैद झाले आहे.













