गडचिरोली मनसेत मोठी खिंडार ; रंजीत बनकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

273

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १० जुलै : गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठे खिंडार पडली आहे.
गडचिरोली जिल्हा शिवसेना पक्ष आढावा बैठक व शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रम ७ जुलै २०२३ ला गडचिरोली येथील वैभव हॉटेलमध्ये पार पडली. या कार्यक्रमात मनसे जिल्हा उपाध्यक्ष रंजीत बनकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणाली प्रभावित होऊन शिवसेना मध्ये पक्ष प्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसलेला आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये मनसेचा सर्वात मोठा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजीत बनकर पक्ष सोडून जाण्याने मनसेमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. १७ वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये ते कट्टर पदाधिकारी म्हणून ओळखले जात होते. जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा विषय निर्माण करणारे रंजित बनकर हे महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांसोबत विदर्भ संघटक किरण पांडव व महिला आघाडी विदर्भ संघटक शुभांगी नांदगावकर, गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख संदीप बरडे , हेमंत जंबेवार, जिल्हा अध्यक्ष राकेश बेलसरे,अनिता मडावी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मध्ये पक्ष प्रवेश केला आणि त्यांचे सोबत ४० पदाधिकारी सहकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here