The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १० जुलै : तालुक्यातील जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथे शनिवार ८ जुलै रोजीलोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन शालेय मंत्रिमंडळ गठीत करण्यात आले. मंत्रिमंडळात शाळा नायक आदीत्य रविंद्र बढई, उपनायक लंकेश मनोहर गावडे., सांस्कृतिक प्रमुख दिक्षांत नरेश करंगामी, उपप्रमुख कु.वैष्णवी धनीराम गावडे, क्रीडा प्रमुख सुमित राजीराम तूलावी, उपप्रमुख कु.भारती रमेश धूर्वे, आरोग्य प्रमूख अमित रविंद्र वट्टी, उपप्रमुख कु.ललिता झूंगा उसेंडी, स्वच्छता प्रमुख हरिष नोहरू धुर्वे, उपप्रमुख कु.श्वेता वचु पोटावी, सहल प्रमुख रितीक दिनेश कोवा, उपप्रमुख कु.शेजल यशवंत पुंघाटे, पाणी पुरवठा प्रमुख विशाल धनिराम गावडे, उपप्रमुख आदित्य राजेश हलामी, शिक्षण प्रमुख हरिष नोहरू धुर्वे, उपप्रमुख कु.नंदिनी रामदास मडावी, वर्ग प्रतिनिधी म्हणून वर्ग ८वी तील वर्ग नायक कु.दिक्षा सुधाकर उसेंडी, वर्गउपनायक दिव्यांश रविंद्र बढई, वर्ग ९वी तील वर्ग नायक प्रिंन्स संपत नरोटे, वर्ग उपनायक कु.मेघा प्रभू हलामी, वर्ग १०वी तील वर्ग नायक आकाश मतरू धुर्वे, वर्गउपनायक कु.कशिष शामराव दुगा यांची निवड करण्यात आली.
मतदान प्रक्रियेत तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल.डब्ल्यू. धुडसे, कु.ए.बी.शेख, सि.डी.गद्देवार, एस.पि.मारकवार, जि.एन.ठमके, ए.एस. संतोषवार यांनी काम पाहिले. यावेळी निवडून आलेल्या मंत्रीमंडळाच्या सदस्यांना शाळेचे मुख्याध्यापक ए.एन.बढई यांनी शपथ दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगाणाने करण्यात आली.
