कन्हारटोला गावात श्रमदानातून गावकऱ्यांनी बांधला वनराई बंधारा

154

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.२१ : तालुक्यातील कन्हारटोला येथे १८ नोव्हेंबर २०२३ ला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला.
धानोरा तालुका येथील कन्हारटोला या गावी एक दिवस श्रमदान करून पशु जनावरे यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. पाण्याची पातळी दिवसेंदिवस दिवस खालावत चालली आहे त्यामुळे जनावरे, पक्षी, शेतकरी यांना पाण्याची अडचण निर्माण होवू नये, जंगलातील पशुपक्षी व गुरांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी तसेच जमिनीची धूप रोखली जावी या हेतूने हा वनराई बंधारा बांधण्यात आला.
यावेळी गाव प्रमुख रंजन उईके, महेंद्र उईके ( उपसरपंच, गट ग्राम पंचायत, लेखा) गावातील ईतर नागरिक, सर्व गावातील मुले व मुलींनी श्रमदानामध्ये सहभाग घेतला आणि वनराई बंधारा बांधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here