The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यात आर बी एस के (राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम) व डी ई आई सी (डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेंशन सेन्टर) अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील ४D’s तपासणी नुसार आढळून आलेले बालके/विध्यार्थी यांची नोंदणी, तपासणी, निदान निश्चिती, उपचार, गरजेनुसार थेरेपी व शस्त्रक्रिया विभागात संदर्भसेवा व तृतीय स्तरावर संदर्भसेवा दिली जाते. RBSK-DEIC तर्फे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिक्षक जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनात तसेच अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.धुर्वे, यांच्या नियोजनामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथील शस्त्रक्रिया विभागात संशयीत जन्मजात आजाराच्या बालकांकरिता दोन दिवसीय “बालरोग शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले.
या दोन दिवसीय शिबिरामध्ये पहिल्यांदाच एकूण ४० बालरोग शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. यामध्ये Phimosis-१७, Hernia-१७, Dermoid Cyst-०२, Hydrocele-०१, Und Testis-०१, Lipoma-०१, Other-०१ यांचा समावेश आहे.
सदर शिबीराकरिता (Indian Association of Paediatric Surgeon) IAPS टीम उपस्थित झाले, यामध्ये लता मंगेशकर रुग्णालय, नागपूर येथील प्रसिद्ध डॉ. मनिषा अलबल (बालरोग शल्य चिकित्सक), डॉ. मांडलिक (बालरोग भूलतज्ञ) व इतर तज्ञ उपस्थित झाले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉ. साखरे (भुलतज्ञ), डॉ.कृणाल (शल्य चिकित्सक), डॉ.डहाके (शल्य चिकित्सक), डॉ. निखिल चव्हाण (बालरोग तज्ञ) उपस्थित होते. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया विभाग येथील इन्चार्ज शिस्टर, अधीपरिचारिका, OT कर्मचारी व शस्त्रक्रियापूर्व व पश्चात रुग्ण वार्ड नं. २ व ५ येथील अधीपरिचारिका यांच्या मदतीने तसेच शिबीर आरबीएसके व डीईआईसी विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वी झाले. असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.