रांगी – वैरागड मार्गावरील झाडे वाहतुकीस अडसर

174

– रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ३ फेब्रुवारी : तालुक्यातील रांगी आणि आरमोरी तालुक्यातील वैरागड मार्गावर रस्त्याच्या कडेला मोठमोठे झाडे असून रांगी ते विहीरगाव मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले नसल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सदर मार्ग सुरळीत करुन देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
रांगी येथून आरमोरीला जाणाऱ्या मार्गावर वाहनाची वर्दळ असते. दुचाकी, चारचाकी, महामंडळाची बस व जड वाहने चालतात. रस्त्यावर वाहनाची वाहतूक करण्यासाठी होणाऱ्या वृक्षांची कटाई करण्यात यावे. नव्याने रस्ता करताना कंत्राटदारांनी रुंदीकरण केले नाही, तसेच डांबरीकरण करताना गावातुन खोदकाम केलेले नाहीत. जुन्याच मार्गावर डांबरीकरण करण्यात आले असल्याने छोटे पुलिया बांधकाम करण्याकरिता आणलेले सिमेंटचे पाईप तिथेच पडून असून याचा त्रास वाहन धारकांना होत आहे.
तालुक्यातील धानोरा आणि आरमोरी तालुक्यातील वैरागड ते रांगी यातील अंतर २० किलोमीटर असून त्यापैकी रांगी ते लोहारा मार्गाचे पूर्णपणे रुंदीकरण केलेले दिसुन येत नाहीत. रस्त्याच्या कडेला लागुन असलेली झाडे वाहतुकीस अडचण निर्माण करणारे आहेत. कोरेगाव ते रांगी गावापर्यंत मोठे वाहन पास होत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हा मुख्य मार्ग असून या रस्त्यावर दररोज एसटी महामंडळाची, खाजगी बस प्रवासी वाहन तसेच दोन व चार चाकी वाहनासह मोठे जड वाहने दररोज धावतात. मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असते याच प्रवासा दरम्यान रांगी ते विहिरगाव पर्यंत रस्ता अरुंद असून रस्त्याला लागूनच मोठ्या प्रमाणात झाडे आहेत, हि झाडे वाहनांना धोकादायक असल्याने ते एक प्रकारे अपघाताला आमंत्रण देतात. मार्गावर धावणाऱ्या वाहन धारकाना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गावरून दररोज येणारे विद्यार्थी कर्मचारी यांच्यासाठी ही झाडे म्हणजे एक प्रकारे डोकेदुखी ठरत असल्याने झाडाच्या फांद्या तोडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here