लेखा येथे प.ह. राधेश्याम बाबा पुण्यतिथी उत्सव दोन दिवस चालणार

105

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३ फेब्रुवारी : तालुक्यातील राधेशाम बाबा पुण्यतिथी उत्सव दोन दिवस चालनार असुन यात्रा रविवार ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे . लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या राधेश्याम बाबा मंदिर सेवा समिती लेखा (मेंढा ) धानोरा जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने दरवर्षी परिसरातील भाविक भक्तगण आवर्जून येथील मंदिराला भेट देतात आणि महाप्रसादाचा लाभही घेतात त्यामुळे समितीच्या वतीने यावर्षी सुद्धा ४ फेब्रुवारी या पहाटे ४.०० वाजता परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. ५ वाजता सामुहीक ध्यान, सकाळी ८.०० वाजता पालखी व मिरवणुक काढण्यात येणार असून महासिद्ध यात्रेचे हे ४६ वे वर्ष आहे.
सदर कार्यक्रमांमध्ये ४ फेब्रुवारीला, घटस्थापना व अभिषेक, राधेश्याम बाबाची पालखी मिरवणूक आणि सायंकाळी ७.०० वाजता सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ, रात्री ८.०० वाजता कीर्तन व जागृती भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. तर रविवार ५ फेब्रुवारीला परिसर स्वच्छतेसह सामूहिक ध्यान, हरिपाठ, ग्रामगीता मार्गदर्शन भजन कीर्तन गोपाल काला आणि दुपारी २.०) वाजता नंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सदर यात्रा व महाप्रसादाचा लाभ परिसरातील लोकांनी घ्यावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here