आरमोरी : पाचव्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचे यकृताच्या आजाराने दुःखद निधन

699

– डॉ. आंबेडकर विद्यालय, आरमोरी येथे घेत होता शिक्षण
The गडविश्व
नरेश ढोरे / आरमोरी, २ डिसेंबर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान यकृताच्या आजाराने दुःखद निधन झाल्याची घटना शुक्रवार २ डिसेंबर रोजी घडली. श्रेयश राजेश बावणकर (११) रा. वैरागड ता. आरमोरी जि. गडचिरोली असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव आहे.
आरमोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात श्रेयश इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत होता. तो काही दिवसांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होता. बऱ्याच उपचारानंतर शुक्रवार २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. सायं.४.३० वाजता वैरागड येथील स्थानिक वैलोचणा नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेयशच्या निधनाने संपूर्ण गावात परिसरात शोककळा पसरली. तो शिक्षण घेत असलेल्या शाळेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रेयश हा आई वडिलाचा एकुलता एक मुलगा असल्याने व शाळेतील एक होतकरू विद्यार्थी अचानक गेल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या मृत्यूने बावणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

(Armori) (The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Tragic death of fifth class student due to liver disease)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here