अहेरी तालुक्यांतील वांगेपली, वट्रा व किष्टापूर दौड़ ग्राम पंचायतसाठी आविसं कडून नामांकन दाखल

190

– माजी आमदार दिपकदादा आत्राम व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे नेतृत्व
The गडविश्व
अहेरी, ३ डिसेंबर : तालुक्यातील वांगेपली, वट्रा व किष्टापूर दौड़ या तीन ग्रामपंचायतीची मुदत संपली असून या तिन्ही ग्राम पंचायतींमध्ये सदस्यसह थेट सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहे. याकरिता आविसं कडून माजी आमदार दिपकदादा आत्राम व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी चव्हाण, नागूला, इद्दावार यांच्याकडे नामांकन दाखल करण्यात आले.
वांगेपली, वट्रा व किष्टापूर दौड़ या तीन ग्राम पंचायतीची मुदत संपली असून या तिन्ही ग्राम पंचायतींमध्ये सदस्यसह थेट सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असुन १८ डिसेंबर २०२२ ला मतदान होणार आहे. या सार्वत्रिक निवडणुकामध्ये जनतेतून थेट सरपंच पद निवड करायचे आहे. २८ नोहेंबर ते २ डिसेंबर २०२२ ला नामांकन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.
त्यामुळे ग्राम पंचायत वांगेपली,वट्रा व किष्टापूर दौड़ तिन्ही ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका करिता आदिवासी विद्यार्थी संघाकडून नामांकन दाखल करण्यात आले. यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, खमनचेरूचे सरपंच सायलू मडावी, इंदारामचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य गुलाबराव सोयाम, महागावचे ग्राम पंचायत सदस्य राजेश दुर्गे, वंदना दुर्ग, माजी सरपंच रमेश पेंदाम, नागापूरे, विनोद रामटेके, किशोर मडावी, महेश नैताम, वासुदेव सिडाम, सूरज तलांडे व सरपंचपदाचे उमेदवार व सदस्यगण व आविस कार्यक्रम उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Update) (Aheri) (Ajay Kankadalwar) (Dipak Atram)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here