The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १२ ऑगस्ट : येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत घराघरात तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करावयाचे आहे करिता प्रत्येक नगरपरिषद, ग्रामपंचायत या ठिकाणी झेंडा विक्रीस ठेवण्यात आलेला असुन तरीसुद्धा घरी प्रत्येक घरी तिरंगा असलाच पाहिजे हे उद्देश ठेवून आरमोरी नगरपरिषद चे आरोग्य व स्वच्छता सभापती तथा भाजयुमो जिल्हा सरचिटणीस भारत बावणथडे यांनी पालोरा प्रभाग क्रमांक २.मध्ये प्रत्येक घरी तिरंगा पोहोचवण्याचे विशेष कार्य केले.
यावेळी त्यांचे सहकारी नगरसेवक मिथुन मडावी, टिंकू बोडे, थांबेश्वर मैंद, नरेश ढोरे, यांनी सहकार्य केले व पालोरा प्रभाग क्रमांक २. येथील नागरिक देवराव हारगुडे, कवडू धोटे, रमेश कुथे, गौरव सोरते, नामदेव हारगुडे,आणि पालोरा येथील नागरिक यांनी सभापती भारत बावणथडे यांचे अभिनंदन केले.