The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १२ ऑगस्ट : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जी सी पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा द्वारा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत विरोंको नमन या अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात रा.से.यो विभागाद्वारे पंचप्राण शपथ घेऊन वसुधा वंदन करण्यात आले तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन डॉ. लांजेवार यांचे शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. पुण्यप्रेड्डीवार, प्रा.करमनकर,राजगडे वाढनकर इत्यादी कर्मचारी बंधू उपस्थित होते.११ ऑगस्ट रोही नगरपंचायत धानोरा येथे पंचप्राण शपथ ग्रहण करण्यात आली. याप्रसंगी धानोरा नगरपंचायत चे अध्यक्षा पौर्णिमा ताई सयाम तसेच नगरपरिषद उपाध्यक्ष ललित बरछा तसेच नगरसेवक, मुख्याधिकारी वलके आदी मान्यवर उपस्थित होते. ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमा अंतर्गत पंचप्राण शपथ ग्रहण कार्यक्रमात सहभागी होऊन शहिदांना अभिवादन करून दीपज्योती लावून पंचप्राण शपथ ग्रहण करण्यात आले तसेच माजी सैनिक भुरसे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपाध्यक्ष ललित बरच्छा यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी एन.एन.एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ज्ञानेश बनसोड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रियंका पठाडे, डॉ. वाघ, डॉ मुरकुटे, प्रा.वाळके, तसेच अन्य प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच लिंक द्वारे प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले.