‘या’ गावाने घेतला घरगुती दारूबंदीचा निर्णय

670

The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑक्टोबर : धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या कोंदावाही गावात आयोजित ग्रामसभेत एकमताने घरगुती दारू बंदीचा निर्णय घेण्यात आला.
कोंदावाही येथे मुक्तिपथ तर्फे दोन दिवशीय सघन गाव भेट दरम्यान ग्रामसभा आयोजित करण्यात आली. ग्रामसभेत घरगुती दारू बंद करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमूने अवैध दारुचे दुष्परिणाम, दारूमुळे आरोग्य, सामाजिक व आर्थिक नुकसान पटवून देत दारुबंदी चे महत्व सांगितले. दरम्यान सर्वानुमते घरगुती दारू बंद करण्याचे ठरविले. वेगवेगळया बैठकी घेऊन घरगुती दारू बंद करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सघन भेटीच्या दुसऱ्या दिवशी गाव पातळी एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात १८ पेशंटनी पुर्ण उपचार घेऊन दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here