समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात ; चिमुकलीसह १२ जण ठार

1431

– अपघाताची मालिका काही थांबता थांबेना
The गडविश्व
बुलढाणा, १५ ऑक्टोबर : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघाताची मालिका काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ रात्री १२.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची माहिती पुढे येत असून या अपघातात ६ वर्षांच्या चिमुकलीसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी आहेत. या अपघातात मिनी बसचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील इंद्रानगर येथे राहणारे जवळपास ३५ भाविक खाजगी टम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन संभाजीनगरच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here