– आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त, अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रार असल्यास कळविण्याचे आवाहन
The गडविश्व
चंद्रपूर, १७ जानेवारी : शहरातही बेकायदेशीर अवैध सावकारी सुरु असलेल्या ठिकाणी सहकार व पोलिस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकली टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेऊन अवैधरित्या सावकारी करणाऱ्या विरुद्ध सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये कारवाई केली जात आहे असे सहकार विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे
जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या आदेशानुसार शासनाकडे बेकायदेशीर अवैध सावकारीची तक्रार प्राप्त झाली. त्या तक्रारीनुसार शहरातील जुनोना चौक, बाबूपेठ गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर हे अवैध सावकारी करीत असल्याची माहिती मिळाली असता चंद्रपूरचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक एस. एस. तुपट, बल्लारपूरचे एम.डी मेश्राम तसेच सहकार खात्यातील कर्मचारी यांच्या पथकासह गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर च्या घरी धाड टाकली. यावेळी आक्षेपार्ह कागदपत्रांचा शोध घेतला असता शोध मोहिमेत, लिहिलेले व कोरे असे ९८ स्टॅम्प पेपर, ११२ कोरे धनादेश, रेव्हेन्यू तिकीट लावलेल्या ६ पावत्या, रकमेच्या नोंदी असलेले चार रजिस्टर, १० बँक पासबुक, तसेच अनेक व्यक्तीच्या नावे असलेले मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, इतर विक्रीपत्र व मालमत्ता पत्र आदी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली व सदर कागदपत्रांच्या चौकशीनंतर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे निबंधक एस. एस. तुपट यांनी सांगितले आहे.
सदर कारवाई चंद्रपूरचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निबंधक एस. एस. तुपट यांच्या पथकाने केली. या पथकामध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बल्लारपूरचे एम.डी मेश्राम, सहकार अधिकारी एस. के. बगडे, प्रशांत गाडे, जाधव, भोयर, सरपाते, गौरखेडे, श्रीमती सिडाम, श्रीमती दरणे आदींचा समावेश होता.
बेकायदेशीर सावकारीच्या अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, चंद्रपूर तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी केले आहे.
(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (JEE Main 2023 Admit Card) (PSG) (Australian Open) (The Last of Us TV series) (OpenAI) (The raid of illegal moneylenders, cooperatives department was also started in this place) (chandrpur News Updates)